Fri, Jul 03, 2020 19:42होमपेज › Jalna › म्हाडा : ३६४ घरांसाठी अडीच हजारांवर नोंदणी

म्हाडा : ३६४ घरांसाठी अडीच हजारांवर नोंदणी

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:03AMजालना ः प्रतिनिधी

सिरसवाडी रोडवरील सर्व्हे क्र. 488 मध्ये अत्यल्प गट योजनेत नागरिकांना म्हाडाचे सहा लाखांत घरकूल मिळणार आहे. म्हाडाच्या या योजनेला नागरिकांनी  चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत 2 हजार 593 जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

जालना नगरपालिकेत 14 ऑगस्टपासून अर्ज विक्रीस सुरुवात झाली आहे. 14 सप्टेंबरपर्यंत अर्ज विक्री सुरू राहणार असून 15 सप्टेंबर रोजी 4 वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. आजपर्यंत घरासाठी घरासाठी सुमारे 2 हजार 593 जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. 

सर्वसामान्यांना घर घेण्याची संधी म्हाडाने उपलब्ध करून दिली आहे. शहरातील सर्वे क्र. 488 मध्ये 364 म्हाडाच्या सदनिकाची सोडत लवकरच होणार आहे. 8 लाख 50 हजार रुपये किंमत असलेल्या या घरासाठी केेंद्र शासनाच्या वतीने 1 लाख 50 हजारांचे तर राज्य शासनाच्या वतीने 1 लाख असे अडीच लाखांचे अनुदान मिळणार असल्याने हे घर सहा लाखांत मिळणार आहे. सदनिका 438.25 चौरस फुटावर बांधण्यात आली असून त्यात एक बैठक खोली, स्वयंपाक घर, बाथरूम व शौचालय राहणार आहे. दोन वर्षांत याचे बांधकाम करण्यात येणार आहे. इच्छुकांना त्यासाठी 336 रुपयांचा अर्ज विकत घ्यावा लागणार आहे.अर्जासोबत 5 हजारांचा डी. डी. जोडावा लागेल.

असे भरावे लागणार सदनिकेसाठी पैसे 

सदनिकेच्या सोडतीनंतर ज्यांची नावे जाहीर होतील त्यांना चार हप्त्यांत 1 लाख 25 हजार रुपये व पाचवा हप्‍ता 95 हजार रुपये भरावा लागणार आहे. ज्यांना पैसे भरणे शक्य नाही अशा लाभार्थ्यांना घर बँकेकडे तारण ठेवूनही कर्ज घेता येणार असल्याने गरीब नागरिकांनाही घर घेणे सोयीचे होणार आहे.

सदनिकेसाठी असे आरक्षण

अनुसूचित जाती व नवबौद्ध - 36, अनुसूचित जमाती-20, भटक्या जमाती-5, विमुक्त जमाती-5, पत्रकार-9, स्वातंत्र सैनिक-9, अंध किंवा शारीरिकदृष्ट्या अपंंग-11, संरक्षण दल व सीमा सुरक्षा दलातील लढाईत मृत झालेल्यांचे कुटुंबीय अथवा जखमी होऊन अपंग झालेले कर्मचारी -7, माजी सैनिक अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेली व्यक्‍ती-18, लोकसभा, विधानसभा व विधान परिषदेचे विद्यमान व माजी सदस्य -7, म्हाडा कर्मचारी -7, राज्य शासनाच्या संविधानिक मंडळ, महामंडळाचे कर्मचारी निवृत्त कर्मचारी-18, शासकीय निवासस्थानात राहणारे व तीन वर्षांत निवृत्त होणारे कर्मचारी-7, कलाकार-6, सर्वसाधारण नागरिक-182