Mon, Jul 06, 2020 14:12होमपेज › Jalna › कुंभार पिंपळगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव 

कुंभार पिंपळगाव बसस्थानकात सुविधांचा अभाव 

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 1:40AMकुंभार पिंपळगाव : प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील बसस्थानकात मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. पिण्याचे पाणी, शौचालय, लाइट बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. कुंभार पिंपळगाव बाजारपेठचे गाव असल्याने दररोज 30 ते 35 गावांचा दररोज संपर्क येतो.   यामुळे येथील बसस्थानकात नेहमीच वर्दळ असते.  वर्षभरापूर्वीच नवीन टिन पत्रे बसविण्यात आले. पडक्या इमारतीच्या दुरुस्ती करून रंगरंगोटी करून फरशी बसविण्यात आली. मात्र येथील मूलभूत सुविधांकडे आगार विभागाने दुर्लक्ष केले आहे. 

प्रवाशांची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनाचे बसस्थानक पार्किंग स्थळ बनले आहे. बसस्थाकाला नावही देण्यात आले नाही. पाण्याची टाकीची व्यवस्था आहे, परंतु त्यात पाणी नसल्याची टाकी ही शोभेचे वास्तू बनली आहे. बसस्थानकातील चौकशी विभाग नेहमी कुलूप बंद असतो. शौचालय नसल्याने महिलाची गैरसोय होते. बसस्थानक परिसर काटेरी झुडपानी वेढला गेला आहे. तसेच विद्युत लाइट ही बंद अवस्थेत आहे. या समस्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याकडे आगार विभागाने लक्ष द्यावे.

Tags : Jalna, Lack, facilities, Kumbhar Pimpalgaon, bus stand