Thu, Jul 09, 2020 04:01होमपेज › Jalna › ऊसतोड पाल्यांच्या शिक्षणासाठी समुपदेशन

ऊसतोड पाल्यांच्या शिक्षणासाठी समुपदेशन

Published On: Nov 19 2018 1:00AM | Last Updated: Nov 19 2018 1:00AMपरतूर : प्रतिनिधी

स्वराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था वाटूर यांच्या संयुक्त विद्यमाने बाल हक्क सप्ताहानिमित्त तालुक्यात स्थलांतरित झालेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालावर जाऊन समुपदेशन करण्यात आले.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे. हाताला काम नाही,  रोजंदारीवर  भागत नाही, अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी गावातील भूमीहीन कामगार उसतोडी, विट्टभट्टी, दगडखाण, जिनिंग मिल या कामासाठी आपल्या मूळ गावातून कामासाठी भटकंती करीत  आहेत. परतूर, मंठा तालुक्यात निम्न दूधना प्रकल्पा मुळे उसक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या पार्श्‍वभुमीवर तालुक्यात उसतोड मजुरांचे  दीड ते दोन हजार  कुटुंबीय भोकरदन, बदनापुर, नांदगाव, गेवराई, बीड या भागातून ऊसतोडीसाठी आली आहेत. बाल हक्क सप्ताहानिमित्त उसतोडी कामगाराच्या  मुलाच्या  शैक्षणिक संदर्भात पालकांशी संवाद साधुन त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. तसेच या भागातील अनेक मजूर कामाच्या शोधार्थ सोलापूर, बारामती, पंढरपुर, कोल्हापुर, कुटुंबासह ऊसतोडीसाठी स्थलांतरीत झाले आहे. जिल्ह्यातून जवळपास एक हजार विद्यार्थी व  पालक कामासाठी परगावी गेले आहेत. ऊसतोडीसाठी पालकांना व मुलांना शिक्षणबाबत उसाच्या फडात जाऊन शिक्षणाबाबत  जागृत करण्यात येत आहे.