Fri, Jul 03, 2020 19:18होमपेज › Jalna › विहीर भ्रष्टाचारप्रकरणी वादळी सभा

विहीर भ्रष्टाचारप्रकरणी वादळी सभा

Published On: Mar 01 2018 1:40AM | Last Updated: Feb 28 2018 11:44PMजालना : प्रतिनिधी

 जिल्हा परिषदेच्या 2018-19 चे मूळ अंदाजपत्रक तयार करून त्यात 39 कोटी 54 लाख 20 हजार 397 रूपयांचा अर्थसंकल्प अर्थ व नियोजन सभापती सतीश टोपे यांनी सादर केला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तेरा कोटी एकोणऐंशी लाख एवढ्या कमी रकमेचा अंर्थसंकल्प होत असल्याने तरतुदी करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, मग्रारोहयोअंतर्गत विहिरींमध्ये अनियमितता करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईसाठी सभेत गदारोळ झाला. अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचेही विरोधी पक्षनेत्यांनी सभागृहात सांगितले. जिल्हा परिषदेची सवर्र्साधारण सभा बुधवारी (दि.28) रोजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. मागील सभेतील मग्रारोहयो अंंंंंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या विहिरींमध्ये झालेल्या अनियमितता करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई झाली नाही, या मुद्यावरून बराच गदारोळ झाला. 

प्रांरभी भाजप सदस्य शिष्टमंडळाने अर्थसंकल्प बुकलेट सदस्यांना उशिराने मिळाल्याने सदस्य या सभागृहासमोर कोणता प्रश्‍न उपस्थित करणार या मागणीचे निवेदन अध्यक्षांना दिले. राहूल लोणीकर यांनी मागील सभेतील मग्रारोहयो अंतर्गत मंजुर करण्यात आलेल्या विहिरींमध्ये झालेल्या अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. हा प्रश्‍न शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने पालकमंत्री लोणीकर यांच्याकडे अध्यक्षांसह सर्वजण जाऊन मंजूर करून घेऊ असे सांगितले. यास सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविला. तसेच या कामात हलगर्जीपणा करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाई करण्याची मागणी केली. यासंबंधीचा जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचा अहवाल पाठवला असून त्यांनी संबंधित एसडीएम यांना पत्रही पाठविले असल्याचे अधिकारी इंगळे यांनी सांगितले. सभेच्या बुकलेट व विहिरीची अनियमितता या मुद्यावरून भाजप, सेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये जुगलबंदी बघायला मिळाली. यात राष्ट्रवादीचे जयमंगल जाधव यांनी 2014 पासून विहिरीचा मुद्दा सभेत येतो. यास कुणाचे पाठबळ मिळते. याबाबत राहुल लोणीकर आक्रमक होऊन पाठीशी घालणार्‍या कारवाईची मागणी केली.