Fri, Jul 03, 2020 17:54होमपेज › Jalna › नवा विचार संपवण्यासाठी आज बंदुकीचा वापर होतोय

नवा विचार संपवण्यासाठी आज बंदुकीचा वापर होतोय

Published On: Feb 13 2018 2:40AM | Last Updated: Feb 13 2018 2:37AMजालना ः प्रतिनिधी 

माणूस मारला तरी त्याचा विचार संपवता येत नसतो. आज नवा विचार संपविण्यासाठी बंदुकीचा वापर केला जात आहे, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सतीश बडवे यांनी केले. जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित 14 व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात सकाळच्या सत्रात मोहन ते महात्मा या विषयावर ते बोलत होते.

ते म्हणाले की, महात्मा गांधी समजून घेताना मोहन ते महात्मा असा समजून घेतला पाहिजे. मोहन हा एक तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे, मात्र त्याच्या स्व-कर्तृत्वाने जेव्हा महात्मा होतो तेव्हा तो असामान्य असतो. महात्मा गांधी हे तुमच्या आमच्यासारखे हाडामासाचे होते, मात्र त्यांनी एकदा केलेली चूक परत केली नाही.  ज्या चुका केल्या त्यांची प्रांजळ कबुली त्यांनी दिली म्हणून त्यांचे सत्याचे प्रयोग हे प्रांजळ आत्मकथन जन्माला आले. महात्मा गांधींचा विचार हा सर्वव्यापी आहे. यावेळी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे, भगवान काळे, डॉ. के.जी. सोनकांबळे, डॉ. उद्धव थोरवे, प्रा. बसवराज कोरे, डॉ. शोभा यशवंते, डॉ. प्रतिभा श्रीपत होते, डॉ. सुनील कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.महावीर सदावर्ते यांनी केले तर आभार डॉ. शिवानंद मुंढे यांनी मानले.