Wed, Feb 19, 2020 00:57होमपेज › Jalna › जालना : लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

जालना : लांडग्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Last Updated: Feb 08 2020 2:29PM

संग्रहित छायाचित्रजालना : प्रतिनिधी

लांडग्याने शेतकरी  व मजुरांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. पिंपळगाव कोलते-तळेगाव परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. कौतिक सोळुंके, मंजरा मुरमूर असे हल्ल्यातील जखमींची नावे आहेत.

सकाळी शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर लांडग्याने हल्ला केला. त्यानंतर लांडग्याने टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या बिहारी मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नेण्यात आले.