Fri, Jul 03, 2020 19:15होमपेज › Jalna › जालना : शेततळ्यात बापासह मुलीचा बुडून मृत्यू

जालना : शेततळ्यात बापासह मुलीचा बुडून मृत्यू

Last Updated: May 26 2020 8:27PM
मठपिंपळगाव (जालना) : पुढारी वृत्‍तसेवा 

मुलीला शेततळ्यात पोहायला शिकवण्यासाठी गेलेल्‍या बापासह मुलीचा बुडून दुर्देवी मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली. ही घटना अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथे आज मंगळवार (दि.२६) रोजी दुपारी घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथील शिवसिंग मन्साराम बहुरे (वय ३८ वर्षे) व त्यांची मुलगी आरती शिवसिंग बहुरे (वय १४ वर्षे) आपल्या गट नंबर २३ मधील शेतातील शेततळ्यात मुलीला पोहणे शिकवत होते. यासाठी एक दोरीचा व कॅनीचा आधार घेतला होता. परंतु आरतीच्या हातातील दोरी सुटल्याने ती बुडू लागली. तेव्हा शिवाजी बहुरे हे तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना तिने त्यांना पकडले. त्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. यामध्ये दुर्देवाने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवसिंग यांच्या पश्चात आई वडील पत्नी, तीन भाऊ, एक मुलगा असा परिवार आहे.