Mon, Jul 06, 2020 15:21होमपेज › Jalna › जालना : कुऱ्हाडीने जखमी करून जबरी चोरी

जालना : कुऱ्हाडीने जखमी करून जबरी चोरी

Last Updated: Jan 18 2020 1:30AM

चोरीचा तपास करताना पोलिसअंबड ( जालना ) : प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील रामनगर तांडा येथे चार चोरट्यांनी मारहाण करुन चोरी केली. कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना ३ जानेवारीच्या मध्यरात्री २.३० च्या सुमारास रामनगर तांडा येथे साईराज ढाब्याजवळ पत्र्याच्या शेडमध्ये घडली.

वाचा : जालना : काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल राजीनाम्याच्या तयारीत

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबड तालुक्यातील रामनगर तांडा साईराज ढाब्या येथील राहणारी प्रेमाबाई नामदेव पवार ह्या पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. ३ जानेवारीच्या मध्यरात्री अडीचच्या सुमारास प्रेमाबाई या त्यांचा नातु सेवालाल विनायक पवार हे त्यांच्या घरी झोपले होते. यावेळी अनोळखी चार चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. प्रेमाबाई यांना मारहाण करुन जखमी केले. तेव्हा नातु सेवालाल हा त्यांना अडवित असताना त्यांच्या डाव्या कानावर जबरीने मारहाण करुन जखमी केले. तसेच प्रेमाबाई यांच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांड्याने व लोखंडी पाईपने मारुन जखमी केले. व तिच्या अंगावरील सोन्याचे मंगळसूत्र, चांदीच्या पाटल्या, थोडे, दोन मोबाईल व नगदी रुपये असे एकुण ६२,९०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने काढून घेतला.

वाचा : जालना : कांदा घेऊन जाणारा ट्रक पलटी

याप्रकरणी अंबड पोलिसांत प्रेमाबाई नामदेव पवार (वय ६५ वर्ष, रा. रामनगर, तांडा साईराज ढाब्याजवळ, ता. अंबड) यांच्या फिर्यादीवरून अनोळखी चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे करीत आहेत.

वाचा : जालना : महाराष्ट्र बँक फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला