Fri, Jul 03, 2020 19:03होमपेज › Jalna › इंटरचेंजमध्ये वाढ; शेतकर्‍यांचा जल्लोष

इंटरचेंजमध्ये वाढ; शेतकर्‍यांचा जल्लोष

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 19 2018 11:23PMजालना : प्रतिनिधी 

नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गात नियोजित असलेला इंटरचेंज पॉइंट जामवाडी, गुंडेवाडी व तांदुळवाडी शिवारातच होणार असल्याने समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या लढ्यास अखेर यश प्राप्त झाल्याबद्दल नुकताच शेतकर्‍यानी मराठा बिल्डिंग परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला.रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार 1 जुलै रोजी औरंगाबाद येथे आले होते. जालन्यातील इंटरचेंज बदलला नव्हे तर वाढवला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली होती. 

या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाले होते. यांनतर समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी इंटरचेंज संदर्भात रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार यांच्याकडे चौकशी केली असता इंटरचेंज बदलला नव्हे तर वाढवला असल्याचे सांगिलते. इंटरचेंज जामवाडी, गुंडेवाडी आणि तांदुळवाडी शिवारात कायम राहणार असल्याने शेतकर्‍यांनी जल्लोष केला आहे. 

रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार 1 जुलै रोजी औरंगाबाद येथे आले होते. जालन्यातील इंटरचेंजच बदलला नव्हे तर वाढवला असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली होती. या संदर्भातील वृत्त प्रकाशित झाले होते. यांनतर समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी इंटरचेंज संदर्भात रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेशाम मोपलवार यांच्याकडे चौकशी केली असता इंटरचेंज बदलला नव्हे तर वाढवला असल्याचे सांगिलते. 

इंटरचेंज पॉइंटसाठी समिती वतीने निवेदन देऊन धरणे, रास्ता रोको आंदोलने करण्यात आली.  रस्ते विकास  महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार नुकतेच औरंगाबाद येथे  आले होते. यानंतर वर्तमान इंटरचेंज बदलला नव्हे तर वाढवला असे वृत्त प्रकाशित झाले होते. यानंतर समितीच्या वतीने आम्ही चौकशी केली. बदलला नव्हे तर वाढवला तसेच जामवाडी, गुंडेवाडी शिवारात होणारी स्मार्ट सिटी येथे होणार असल्याचे सांगण्यात आले. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांनी पुढाकार घेतला आहे. अशी माहिती समृध्दी महामार्ग शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण गजर व कार्यवाह प्रशांत वाढेकर यांनी दिली.