Mon, Jul 06, 2020 08:38होमपेज › Jalna › नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ

नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 11:37PMभोकरदन- विजय सोनवणे  

नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ करण्याच्या शासनाने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांतून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, अधिकारात वाढ होत असतानाच विकासकामांची अपेक्षाही आता नगराध्यक्षांनी पूर्ण करावी, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.राज्य शासनाने 2018 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 4 अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा नगर  पंचायती व औद्योगिकनगरी अधिनियमातेकेलेल्या सुधारणेनुसार आता थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे. 

या नवीन निर्णयानुसार पहिल्या अडीच वर्षात नगराध्यक्षांवर अविश्‍वास दाखल करता येणार नाही. त्यानंतर निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांनी मागणी केल्यास जिल्हाधिकारी अध्यक्षावरील आरोपांची एक महिन्यात किंवा वाढीव दोन अशा जास्तीत जास्त तीन महिन्यात चौकशी पूर्ण करून  शासनास कलम 55 अ नुसार आता अहवाल पाठवणार आहेत.