Thu, Jul 09, 2020 05:06होमपेज › Jalna › टंचाईग्रस्त ७२ गावांवर होणार मात

टंचाईग्रस्त ७२ गावांवर होणार मात

Published On: Apr 10 2018 1:16AM | Last Updated: Apr 10 2018 12:20AMजाफराबाद : प्रतिनिधी 

सामूहिक प्रयत्नातून काहीही अशक्य नाही हे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. सामूहिक श्रमदानातून 72 गावांमध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी वज्रमूठ आवळली आहे. 
पाणी फाउंंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेत या गावाने नवनिर्माणतेचा चंग बांधला आहे. रविवार, 8 एप्रिलपासून स्पर्धेला प्रारंभ झाला. रात्री बारा वाजता तालुक्यातील अनेक गावात अधिकृतपणे स्पर्धेत सहभागी होत जल व्यवस्थापनाचा निर्धार केला. 

जिल्ह्यातून जाफराबाद तालुक्याची या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्या अनुषंगाने याबाबतची जनजागृती तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून करण्यात आली. विशेष म्हणजे गावातील सर्वच वयोगटातील सदस्य या कामात स्वयंस्फूर्तीने उतरले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात गावात सकारात्मक बदत घडून येणे क्रमप्राप्त झाले आहे.या स्पर्धेत तालुक्यातील 101 गावांपैकी 94 गावांनी सहभाग घेऊन नाव नोंदणी केली आहे. यात गावातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासाठी असलेल्या  पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्प्यात सात गावांतील 55 सदस्य चार दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता फुलंब्री तालुक्यातील वाघोळा व नंतरच्या खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे 10 टप्प्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे.

Tags : Jalna, 72 villages,  collective, labor, villagers, vulnerable, overcoming, water, scarcity.