Fri, Jul 03, 2020 20:09होमपेज › Jalna › लखमापुरीत सहा ठिकाणी चोर्‍या

लखमापुरीत सहा ठिकाणी चोर्‍या

Published On: Dec 31 2018 2:00AM | Last Updated: Dec 31 2018 2:00AM
सुखापुरी : प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील लखमापुरी येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी तब्बल सहा ठिकाणी चोर्‍या करून पोलिसांनाच आव्हान दिले. विशेष म्हणजे परिसरातील ऊसतोड कामगारांच्या झोपड्याही चोरट्यांनी सोडल्या नाहीत. कोंंबिंग ऑपरेशन संपताच ऊसटोळीतील कामगारांच्या झोपड्यांसह सहा ठिकाणी चोरी करून 72 हजार रुपयांसह, मोटारसायकल, गृहोपयोगी वस्तू,चांदीचे दागिने व मोबाइल फोन चोरट्याने चोरून नेले.

लखमापूरी येथील अशोक गंगाधर तांदळे यांच्या घरी रात्री चोरट्याने कम्पाउंडमधील गेट उघडून प्रवेश केला मात्र चॅनलगेटचे कुलूप टॉमीच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न फसला. चोरट्याने व्हरांड्यातच लावलेली दुचाकी लंपास केली. टॉमीच्या साहाय्याने गेट उघडले नसल्याने मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला.

त्याच रात्री चोरट्यांनी रुस्तुमराव भापकर यांच्या घरातील रोख 15 हजार रुपये पळविले. पाराजी पिसूळ झोपलेले असताना त्यांच्या घराची  झाडाझडती करून चोरट्यांनी चांदीचे जोडवे व 5 साड्याही लंपास केले.  

ऊसटोेळीलाही केले लक्ष्य : चोरट्यानी समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडीसाठी आलेल्या टोळीला लक्ष्य केले. टोळीचे  मुकादम रमेश बदू जाधव यांच्या झोपडीतून 20 हजारांची रोकड व  मोबाइल फोन चोरला. त्यांनतर विनायक फुलचंद जाधव यांच्या झोपडीतून 20 हजार रुपये रोख चोरट्यांनी चोरले. त्यांनी  आठवडी बाजारात  गाय विक्री करून आलेले पैसे घरात ठेवले होेते. हे पैसे त्यांना  मुलांच्या शिक्षणासाठी बीड येथे पाठवायच्या होेते. त्याच टोळीतील लक्ष्मण नीला जाधव यांच्या झोपडीतून वाढे विक्रीतून आलेले 7 हजार रुपये चोरट्यांनी पळविले.