Mon, Jul 06, 2020 09:15होमपेज › Jalna › पॉलिटेक्निकपेक्षा आयटीआयवाल्यांना जॉब

पॉलिटेक्निकपेक्षा आयटीआयवाल्यांना जॉब

Published On: Feb 15 2018 2:28AM | Last Updated: Feb 15 2018 10:47AMजालना : प्रतिनिधी

दहावीनंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यास झटपट जॉब मिळत आहे, तर  पॉलिटेक्निक केल्यानंतर केवळ 10 टक्के विद्यार्थी जॉबसाठी पात्र ठरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पॉलिटेक्निकपेक्षा आयटीआय बरे असे म्हणण्याची वेळ आता विद्यार्थ्यांवर आली आहे. 

वाचा : ‘यूपीएससी’ला घरघर; बँकांतही आऊटसोर्सिंग

शासकीय तंत्रनिकेतनच प्रिन्सिपल एस. एन. नवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जालना तंत्रनिकेतनमध्ये पाच शाखांसाठी 415 जागा असल्याचे सांगितले. त्यात सिव्हिलसाठी 120, मेकॅनिकलच्या 120, इलेक्ट्रिकल 120, कॉम्प्युटरच्या 60 तर केमिकलच्या 30 जागा असल्याचे सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये बजाज, एल अ‍ॅण्ड टी मुंबई, एल. जी., बालकृष्णन व मेटारोल जालना, थॉट वर्क बेंगलोर, झवेरी केमिकल गोवा, ठाकरजी साल्वन्ट जालना आदी कंपन्या कॅम्पस इटरव्ह्यूसाठी येथे येतात. सरासरी 50 मुले विविध कंपन्यांच्या परिसर मुलाखतीत निवड केली जाते. त्यांना प्रतिवर्ष सव्वा ते दीड लाखाचे पॅकेज मिळते. उर्वरित जवळपास 90 टक्के विद्यार्थ्यांचा ओढा इजिनियरिंग करण्याकडे असतो. 

वाचा : कौशल्य पणाला लावूनही बेरोजगार

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एम. आर. गायकवाड यांनी सांगितले की, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून निघणार्‍या शंभर टक्के मुलांना नोकरी मिळते. जिल्ह्यात आठ शासकीय आयटीआय तर चार खासगी आयटीआय आहेत. जालना आयटीआयमध्ये 15 टे्रड असून 414 जागा आहेत. गत वर्षी 414 जागांसाठी तब्बल 1500 विद्यार्थ्यानी अर्ज केले होते. यावरून आयटीआयकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. 

वाचा : डमी उमेदवारांनी लाटल्या सरकारी नोकर्‍या

आयटीआयमध्ये शिटमेटल वर्कर, ड्राफ्टमन सिव्हिल, टर्नर, मोटर मॅकॅनिक, आर. एस. पी. मेकॅनिक, डिझेल, मशिनिस्ट, स्विंग टेक्नॉलॉजी आदी कोर्स आहेत. या आयटीआयमध्ये एनआरबी बेअयरिंग्ज, एल. जी. बी. प्रा. लि., विनोदराय अ‍ॅण्ड कंपनी, अप्रुकॉप इंडस्ट्रिज, जालना, रुचा इंडस्ट्रीज, बर्वे इंजिनियरिंग, इंन्डुलन्स, व्हिडिओकॉन, धूत, औरंगाबाद इलेक्ट्रिकल आदी कंपन्याचे कॅम्पस इंटरव्ह्यू होतात. त्यात जवळपास सर्वच विद्यार्थ्यांची निवड होते. विद्यार्थ्याना प्रतिमहिना 8 ते 25 हजारांपर्यत पॅकेज मिळते. आयटीआय व पॉलिटेक्निक या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये फरक जाणून घेतला असता आयटीआयचे विद्यार्थी प्रत्यक्ष काम करतात, तर पॉलिटेक्निकचे विद्यार्थी सुपर व्हिजन करतात. आज सुपर व्हिजन करणार्‍यांपेक्षा प्रत्यक्ष काम करणार्‍यांना मागणी असल्याचेही दिसून आले.

वाचा : पॅकेज तर सोडा, सहा हजारांत मिळतात इंजिनीअर