Fri, Jul 03, 2020 19:13होमपेज › Jalna › आयटीआय  प्रवेश : 388 जागांसाठी 1400 अर्ज दाखल 

आयटीआय  प्रवेश : 388 जागांसाठी 1400 अर्ज दाखल 

Published On: Jun 28 2018 1:32AM | Last Updated: Jun 28 2018 12:17AMजालना : प्रतिनिधी

आयटीआयमध्ये  प्रवेश घेण्यासाठी या वर्षी  विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 388 जागांसाठी बुधवार, 27 जूनपर्यंत तब्बल 1400 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्टे्रशन केले. ऑनलाइन अर्ज भरण्याची 30 जून ही शेवटची तारीख राहणार आहे.  अर्जाबाबत मागील सर्व विक्रम या वर्षी मोडीत निघणार  आहे. 

आयटीआयमधील विविध ट्रेंडसाठी 1 जूनपासून ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून  आयटीआयच्या विद्यार्थ्याना शंभर टक्के नोकरी मिळण्याची खात्री असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा आयटीआयकडे असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या अभ्यासक्रमास प्रवेश घेत असतानाच आता शहरी भागातील विद्यार्थी आयटीआय प्रवेशासाठी उत्स्ाुक असल्याचे दिसत आहे. दहावीनंतर पूर्वी विद्यार्थ्यांचा ओढा पॉलिटेक्निककडे होता. मात्र पॉलिटेक्निक केल्यानंतर जॉब मिळत नसल्याने आता ट्रेंड बदलत असल्याचे दिसत आहे. जालना आयटीआयमध्ये इलेक्ट्रेशियन, इलेक्ट्रॉनिक्स, जोडारी, मशिनिस्ट, एसी रिपेरिंग, वायरमन, यांत्रिक मोटारगाडी हे दोन वर्षासाठी तर डिझेल मेकॅनिक, सिट मेटल वर्कर, टर्नर, वेल्डर हे अभ्यासक्रम एका वर्षासाठी आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आयटीआयमध्ये येऊन कन्फर्मेशन पावती घ्यावी लागणार आहे. 30 जूननंतर मेरिट लिस्ट लागणार आहे.