Mon, Jul 06, 2020 08:08होमपेज › Jalna › पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

पत्नी माहेरी गेल्याने पतीची आत्महत्या

Published On: Apr 24 2018 1:39AM | Last Updated: Apr 24 2018 1:39AMराजूर ः

पत्नी माहेरी गेल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना भोकरदन तालुक्यातील  खामखेडा येथे घडली. काकासाहेब सुखदेव नागवे (वय 40) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. काकासाहेब याने राहत्या घरातील अँगलला रूमाल बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी घडली. घटनास्थळास जमादार विष्णू बुनगे, मांटे यांनी भेट देऊन काकासाहेबला राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र, दवाखान्यात नेण्याअगोदरच मृत्यू झाला होता.

याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.