Sun, Sep 27, 2020 03:46होमपेज › Jalna › जालना : वडीगोद्री मंडळात जोरदार पाऊस

जालना : वडीगोद्री मंडळात जोरदार पाऊस

Published On: Sep 19 2019 2:05PM | Last Updated: Sep 19 2019 1:54PM

जालन्यात पाऊस बरसलावडीगोद्री : प्रतिनिधी 

वडीगोद्री मंडळात गेल्या दोन दिवसात २२७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी १०३ मिमी पाऊस तर दुसऱ्या दिवशी बुधवारी १२४ मिमी अशी नोंद वडीगोद्री मंडळात झाली आहे. आतापर्यंत वडीगोद्री मंडळात ७४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याचबरोबर शहागड परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली असून या पावसामुळे शेती शिवार जलमय झाले आहे. वडीगोद्री जवळील नालेवाडी येथील लेंडी नदीला पाणी आले असून पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे.

तर आन्वा परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. काल, बुधवारी येथे ६५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज पुन्हा पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे मूग, उडीद, भुईमूग व बाजरी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.