होमपेज › Jalna › चार लुटारू  ३६ तासांत जेरबंद

चार लुटारू  ३६ तासांत जेरबंद

Published On: May 28 2018 1:43AM | Last Updated: May 27 2018 11:13PMजालना : प्रतिनिधी

येथील अतिरिक्‍त औद्योगिक वसाहतीत गिताई स्टील कंपनीच्या मॅनेजरला भरदिवसा चाकूचा धाक दाखवून 6 लाखांची रोकड लुटणार्‍या चार जणांना 36 तासांत पोलिसांनी अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 6 लाख रुपयांच्या रोकडसह दुचाकीसह एकूण 6 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्‍त केला. 

औरंगाबाद रोडवरील अतिरिक्‍त औद्योगिक वसाहतीत गुरुवार, 24 मे रोजी भाग्यलक्ष्मी स्टीलमधून गिताई स्टीलचे मॅनेजर सनी चिलखा यांनी दैनंदिन व्यवहाराचे 6 लाख रुपये घेतले. दुपारी एकच्या सुमारास ते गिताई स्टीलकडे मोटरसायकलवरून निघाले असता वाहतूक जाम झाल्याने त्यांनी मोटरसायकल उभी केली. यावेळी पाठीमागून विना क्रमांकाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोन जणांनी त्यांच्या हातातील हिरव्या रंगाच्या पिशवीत ठेवलेली रोकड चाकूचा धाक दाखवून लुटून नेली.या घटनेने संपूर्ण औद्योगिक वसाहतीत व्यापारी वर्गात खळबळ उडाली. 

याप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्यासह इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वारे, सहायक पोलिस उपनिरीक्षक शेख रज्जाक, जमादार भालचंद्र गिरी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, रामेश्‍वर तेंलगे्र, रंजित वैराळ, विलास चेके आदींनी केली. पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या काही तासांत मुद्देमालासह आरोपींना जेरबंद केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. दरम्यान, आरोपींना 29 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

औद्योगिक वसाहतीमध्ये भरदिवसा घडलेल्या या धाडसी चोरीमुळे उद्योजक, नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. आरोपींना कायद्याचा धाक आहे की नाही, असे एक ना अनेक प्रश्‍न नागरिकांच्या मनात निर्माण झाले होते. भरदिवसा चाकूचा धाक दाखवून लूट होत असेल आणि दिवसाढवळ्या असे प्रकार घडत असतील तर पोलिसांबद्दल नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण तयार झाले होते. परंतु पोलिसांनी काही तासांतच आरोपींच्या मुसक्या आवळल्या. मुद्देमालासह आरोपींना पकडल्याने पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

पोलिस निरीक्षक गौर यांनी तीन पथके तयार केली. खबर्‍याने दिलेल्या माहितीवरून ही रक्‍कम अकालसिंग राजूसिंग जुन्‍नी याने त्याच्या सहकार्‍यांसह लुटल्याची माहिती मिळाली. आरोपींनी लुटलेली रक्‍कम वाटून घेत वेगवेगळ्या दिशेला पलायन केल्याची माहिती तपासात 

मुकुंदवाडी, औरगाबाद) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्यांच्या ताब्यातून 6 लाख रुपये रोख 40 हजारांची मोटरसायकल तसेच एक खंजीर असा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.