Fri, Jul 03, 2020 18:41होमपेज › Jalna › पीक कर्जासाठी शेतकर्‍यांची तोबा गर्दी 

पीक कर्जासाठी शेतकर्‍यांची तोबा गर्दी 

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:21AMटेंभुर्णी : प्रतिनिधी

पीक कर्जासाठी येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेमध्ये शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत आहे. पीक कर्ज मिळवण्यासाठी शेतकर्‍यांना आटापिटा करावा लागत आहे. शुक्रवारी चारशेपेक्षा अधिक शेतकरी रांगेत उभे होते, मात्र अनेकांना कर्ज न मिळताच माघारी फिरावे लागले. बँकेने नियोजन करण्याची मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे. बँकेत 1700 खातेदार आहेत.

गतवर्षी कर्जमाफीच्या कचाट्यात शेतकर्‍यांना पीक कर्जाची रक्कम मिळालीच नाही. माफी झालेल्या शेतकर्‍यांना यावर्षी बँकांकडून पीक कर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकर्‍यांची मोठी गर्दी होत आहे. बँकेच्या शाखेकडून एकाच दिवशी तीन गावांतील 24 शेतकर्‍यांचे पीक कर्ज मागणीचा अर्ज करण्यात येत असून यासाठी टेंभुर्णी येथील शाखेसमोर पहाटे चार वाजल्यापासून शेतकर्‍यांनी रांगा लावल्या होत्या. 304  शेतकरी आठ वाजेच्या सुमारास बँकेच्या समोर रांगेमध्ये उभे होते. दरम्यान या परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. शेतकर्‍यांचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याने शेतकर्‍यांना पीक कर्ज मिळवण्यासाठी तीन ते चार महिन्यांची वाट पाहावी लागणार अशी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कैलास देशमुख म्हणाले, बँकेकडून चालू वर्षाचा फेरफार मागितला जात आहे.सातबारा उतार्‍यावर पीक कर्ज देणे अपेक्षित असले तरी विनाकारण वेठीस धरले जात आहे.