Thu, Jul 09, 2020 02:58होमपेज › Jalna › सोलापूर महामार्गावर तासभर रास्ता रोको

सोलापूर महामार्गावर तासभर रास्ता रोको

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:06AMवडीगोद्री : प्रतिनिधी

वडीगोद्री येथे प्रस्तावित भरीव उड्डाणपूल रद्द करण्यासाठी 1 मे रोजी युवा एकता प्रतिष्ठान व गावकर्‍यांच्या वतीने औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत 1 तास रास्ता रोको करण्यात आला. तहसीलदार दत्ता भारस्कर यांना यावेळी निवेदन देण्यात आले.

वडीगोद्री येथील प्रस्तावित भरीव उड्डाणपुला-बाबत बोलताना संयोजन समितीचे सुनील काळे  म्हणाले, होणार्‍या भरीव उड्डाणपुलामुळे सर्व मार्केट संपणार आहे. परिसरातील प्रवाशांना भविष्यात बस थांब्याची अडचण होणार असून व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व मार्केट हे राहण्यासाठी  हा उड्डाणपूल रद्द होणे गरजेचे आहे. 

यावेळी संयोजन समिती सदस्य कुलदीप आटोळे  म्हणाले की, या भरीव उड्डाणपुलामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम होईल व बेरोजगारांची संख्या वाढेल. भरीव उड्डाणपुलाचा फायदा हा कंपनीला होणार आहे. एकूणच ग्रामस्थांचा विरोध पाहता हा पूल रद्द करण्याची मागणी होत आहे.