Thu, Jul 09, 2020 03:25होमपेज › Jalna › पाणी नियोजनाचा पाच ग्रामपंचायतींचा संकल्प

पाणी नियोजनाचा पाच ग्रामपंचायतींचा संकल्प

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:57AMजालना : प्रतिनिधी

जागतिक पाणी दिनानिमित्त बदनापूर तालुक्यातील कंडारी, परदेशीवाडी, लक्ष्मणनगर तांडा, खडकवाडी, पीरवाडी, घाटी सिरसगाव, लालवाडी, कासेवाडी, सागरवाडी, ढासला या पाच गावांनी पाणी नियोजनाचा संकल्प केला आहे.

     
जागतिक पाणी दिनाचे औचित्य साधून बदनापूर तालुक्यातील घाटी सिरस गाव येथे अ‍ॅक्शन अ‍ॅड या संस्थेमार्फत जागतिक पाणी दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये अ‍ॅक्शन एड या संस्थेचे प्रकल्प अधिकारी दशरथ सिरसट,  प्रकल्प समन्वयक शंकर कुडके, कमल साबळे, नामदेव बिजुले, गब्बरसिंग, शंकरराव खरात,  भागवत वाघमारे व सिरसगाच्या  सरपंच ठकुबाई सरोदे, उपसरपंच सीमा  घोरपडे, कंडारी, लक्ष्मणनगर तांडा,  खडकवाडी सागरवाडी या गावचे सरपंच व गाव प्रतिनिधी उपस्थित होते. 

या प्रसंगी  अ‍ॅक्शन एड या संस्थेचे  प्रकल्प अधिकारी  दशरथ सिरसाट यांनी महिला आणि दुष्काळ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रकल्प समन्वयक शंकर कुडके यांनी पाण्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले .