Mon, Aug 03, 2020 14:19होमपेज › Jalna › जालना : उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

जालना : उद्योजकाची गोळ्या घालून हत्या

Last Updated: Feb 24 2020 1:26AM

मृत व्यापारी राजेश नहारजालना : प्रतिनिधी  

परतूर येथील प्रसिध्द उद्योगपती राजेश नहार यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार करून त्यांची हत्या केली. ही खळबळजनक घटना शनिवारी मध्यरात्री जालना-वाटूर महामार्गावर पोखरी पाटी नजिक घडली. यावेळी घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व तपासाचे आदेश दिले.  यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिह गौर हेही उपस्थित होते. 

अधिक वाचा : जिल्ह्यात 3,487 कुपोषित बालके

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री राजेश नहार हे चारचाकी वाहनातून जात होते. त्या दरम्यान, जालना-वाटूर महामार्गावर पोखरी पाटी नजिक ते आले असता त्यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. यात हल्ल्यात नहार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परतूर परिसरात दहशतीचे वातावरण असून खळबळ उडाली आहे. 

अधिक वाचा : ‘सीएएची’ अंमलबजावणी होणार नाही : भुजबळ