Thu, Jul 09, 2020 04:05होमपेज › Jalna › वाकडी-कुकडीत भीषण पाणीटंचाई

वाकडी-कुकडीत भीषण पाणीटंचाई

Published On: Nov 28 2018 1:21AM | Last Updated: Nov 27 2018 11:30PMवाकडी : विलास खांडवे 

भोकरदन तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकडी येथे हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. वाकडी-कुकडी  गावात उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतु पाणीटंचाई राहत असल्याने दुरूवरून पाणी आणावे लागत आहे. गावात जलस्त्रोत नसल्याने गावालगत असलेल्या छोट्या तलावरील विहिरीचे दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.

गु्रप ग्रामपंचायत असलेल्या वाकडी-कुकडी गावात नेहमीच पाण्याची भीषण टंचाई जाणवत असते. गाव मोठे असल्याने प्रशासनाच्या वतीने सुरू केलेल्या दोन टँकरवरती गावाची तहान भागत नाही. या दोनगावासाठी किमान चार टँकरची आवश्यकता आहे. गावातील भीषण पाणीटंचाई लक्षात घेता या भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारणची कामे होणे आवश्यक आहे. होणारे कामेही निष्कृष्ट दर्जाची होत असल्याने  पाणीटंचाई जाणवते.  यावर्षी या भागात पाऊस अल्प झाल्याने ऑक्टोबर महिन्यापासून गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागातील विहिरी कोरड्या पडल्या, हातपंप पाण्याअभावी बंद, बोरला ही पाणी नसल्याने ग्रामस्थांना शेतातील विहिरीतून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या भागात छोटा तलाव असून त्यांतच जेमतेम पाणी असून त्यावरच गावाची तहान भागली जात आहे. टँकर व तलावातील दुषीत पाणी पिण्याची वेळ  ग्रामस्थांवर आली आहे.  याकडे सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष देऊन गावाकर्‍यांना पिण्याची शुध्द पाणी कसे मिळेल. यांची व्यवस्था करण्याची गरज आहे. मात्र असे होताना दिसत नाही.      

पाणीटंचाई त्रास महिला शाळकरी विद्यार्थ्याना सहन करावा लागत आहे.  कारण ज्या सार्वजनिक विहिरीत टँकरद्वारे पाणी सोडण्यात येते. ते पाणी मिळविण्यासाठी विहिरीत महिला व लहान मुलांची जास्त गर्दी दिसून येते. विहीरीव बसलेल्या जाळीत ठिकठिकाणी मोठ-मोठ्या खिडक्या ठेवल्याने यात पाणी भरण्याना धोकानिर्माण होऊ शकतो. हा धोका ओळख ग्रामपंचायतीच्या वतीने गावकर्‍यांना समान पाणी कसे मिळेल, यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे.