Mon, Jul 06, 2020 14:04होमपेज › Jalna › लाभार्थ्यांना सवलतीत धान्य 

लाभार्थ्यांना सवलतीत धान्य 

Published On: Feb 18 2019 1:12AM | Last Updated: Feb 18 2019 12:56AM
जालना: प्रतिनिधी

सन 2018 च्या खरीप हंगामात दुष्काळ जाहीर केलेल्या गावांमधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत समाविष्ट न झालेले पिवळे किंवा केशरी रेशनकार्डधारकांना रेशनचे सवलतीच्या दरात धान्य देण्यात येत असल्याने जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट न झालेली. पिवळी किंवा केशरी रेशनकार्ड असलेल्या व्यक्ती सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळण्यास पात्र ठरवण्याची मागणी करतील. त्या व्यक्तीचे उत्पन्नाच्या व उद्दिष्टाच्या मर्यादेत अंत्योदय योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी यामध्ये त्यांच्या शिधापत्रिकांचे संगणकीकरण व आधार लिंक करून लवकरात लवकर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समावेश करण्यात यावा  अशा सूचना ही पुरवठा विभागाकडून करण्यात आल्या आहे. दुष्काळी गावातील ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका उपलब्ध नसतील. त्या नागरिकांना निकषानुसार व त्यांच्या वार्षिक उत्पन्नानुसार देय प्रवर्गातील शिधापत्रिका तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी. अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पीओएस मशीनव्दारे अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवल्यानंतर अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या नोंदी पीडीएस प्रणालीवर उपलब्ध असून पीओएस यंत्राच्या वापरामुळे पोर्टबिलीटीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या सुविधेव्दारे पोर्टेबिलिटीने पात्र शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा  लाभ घेण्याची अनुमती याद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या गावांमधील पात्र शिधापत्रिकाधारकांना स्थलांतरणामुळे विहित केलेल्या रास्तभाव दुकानातून अन्नधान्य घेणे सुलभ होईल. शासनाच्या या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त गावांतील लाभार्थ्यांना दिलासा मिळाला.