Thu, Jul 09, 2020 03:11होमपेज › Jalna › जिल्ह्यात आज धनगर समाजाचे चक्‍का जाम आंदोलन 

जिल्ह्यात आज धनगर समाजाचे चक्‍का जाम आंदोलन 

Published On: Aug 13 2018 1:23AM | Last Updated: Aug 13 2018 1:21AMजालना : प्रतिनिधी

धनगर आरक्षणासह समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवार (13) रोजी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून चक्क जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमी रविवारी (12) रोजी शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासनाला 12 ऑगस्टचा अल्टिमेटम देण्यात आला होता, परंतु शासनाने याची दखल न घेतल्याने  जिल्हा व तालुक्यातील सर्व महामार्गावर रास्ता रोकोच्या माध्यमातून चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनानिमित्त रविवारी (12) रोजी शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत चक्का जाम आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेऊन नियोजन करण्यात आले आहे. हा चक्का जाम आंदोलन शांततेच्या मार्गाने करून रुग्ण, वयोवृद्ध व  लहान मुलांची गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. या बंदसाठी छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैठक संपल्यानंतर शहरातील संभाजी उद्यान येथून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली संभाजी उद्यानमार्गे शनिमंदिर, गांधी चमन, मस्तगड, मुथ्था बिल्डिंग, मामा चौक, सिंधी बाजारमार्गे शिवाजी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.

या ठिकाणी होणार आंदोलन

सकल धनगर समाजाच्या वतीने जालना शहरालगतच्या औरंगाबाद, अंबड , मंठा, राजूर चौफुली रामनगर, वीरेगाव, पीरपिंपळगाव, बावणे पांगरी.  तसेच बदनापूर येथे जालना-औरंगाबाद महामार्गावर महाराष्ट्र बँकेसमोर रस्ता रोको तर अंबड येथे जालना-अंबड मागार्र्ंवरील तहसील कार्यालयासमोर,जामखेड नागरिकांच्या वतीने औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर,  भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोको करण्यात येणार आहे. टेंभुर्णी येथील शिवाजी चौकात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात होणार आहे. याशिवाय मंठा, घनसांवगी, जाफराबाद, परतूर यांसह अन्य ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे.