Mon, Jul 06, 2020 06:54होमपेज › Jalna › हौदात पडून दोन बालकांचा मृत्यू

हौदात पडून दोन बालकांचा मृत्यू

Published On: Dec 14 2018 1:45AM | Last Updated: Dec 14 2018 1:45AM
जालना : प्रतिनिधी

तालुक्यातील कुंभेफळ येथे हौदात पडून दोन वर्षीच्या दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. 13) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या बाबत माहिती अशी कि, कुंभेफळ येथील जालना  सुतगिरणी परिसरात राहणारे  स्पंदन ज्ञानेश्‍वर उमप (2) व दयानंद भागवत क्षिरसागर(2)हे घराजवळ असलेल्या हौदाजवळ खेळत होते. त्यानंतर दोघेही गायब झाल्याने दोघांच्याही घरातील मंडळीनी त्यांचा शोध सुरु केला. 

शोध घेउनही ते सापडत नसल्याने अचानक त्यांनी हौदामधे पाहीले असता दोंघाचे मृतदेह पाण्यात आढळुन आले. नातेवाईकांंनी तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषीत केले. तपास पोलिस कर्मचारी राऊत हे करीत आहेत. या घटनेने कुुुंभेफळ सुतगिरणी परिसरात खळबळ उडाली आहे.