Mon, Jul 06, 2020 13:37होमपेज › Jalna › गुन्हे शाखेने केला बनावट दारू टोळीचा पर्दाफाश

गुन्हे शाखेने केला बनावट दारू टोळीचा पर्दाफाश

Published On: Dec 05 2018 1:33AM | Last Updated: Dec 05 2018 1:31AMजालना : प्रतिनिधी

देशी व विदेशी बनावट दारू तयार करणारी टोळी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व त्यांच्या पथकाने शहरात पकडली. या टोळीच्या ताब्यातून देशीदारूचे 20, विदेशी दारूचे 7 विविध कंपन्यांचे बनावट लेबल व स्टिकर, रिक्षा व मोटारसायकल असा  2 लाख 28 हजार 645 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबर्‍याने माहिती दिली होती की, गोवा, दिव दमन राज्यातून कमी किमतीत विदेशी दारू चोरट्या मार्गाने शहरात आणली जात आहे. बनावट दारू विविध नामांकित कंपन्याच्या कंपन्याच्या नावाने पॅकिंग  करुन तिची विक्री होत आहे.  आरोपींनी बॉटलवरील पुर्वीचे स्टीकर व लेबल काढुन त्यावर   महाराष्ट्र राज्याचा परवाना असलेले बनावट स्टीकर प्रिंट करुन ते लावुन  विक्री करीत असल्याचे समोर आली. भिंगरी कंपनीची बनावट देशीदारु तयार करुन तिच्यावरही बनावट स्टीकर लावुन विक्री केल्या जात असल्याची माहिती पोलिंसाना मिळाली. या माहीतीच्या आधारे पोलिसांनी आनंद नगर मैदानाजवळ सापळा रचला असता त्यांना संशयास्पद रिक्षा येतांना दिसली.

पथाकाने रिक्षाला थांबवुन तपासणी केली असता रिक्षातील मागील सिटवर अहमदनगर जिल्ह्यातील कोळपेवाडी येथील केएसके डिस्टलरीज कंपनीच्या भिंगरी देशी दारुच्या 180 मिली.च्य 48 बॉटल असलेले 15 बॉक्स मिळून आले. यावेळी पोलिसांनी दारुच्या बॉक्सबाबत रिक्षा चालक शेख वसीम शेख रियाज (रा.मोदीखाना)याच्याकडे विचारणा केली असता त्याने हे बॉक्स जुगल मदनलाल लोहीया व मुकेश रावसाहेब राऊत यांचे असल्याचे सांगितले. पोलिसांनी रिक्षातील दारुची बारकाईने पाहणी केली असता ती  दारु बनावट  असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.  चौकशीत मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी कन्हैयानगर भागातील आकाश बीअर बारजवळ असलेल्या साई आगंद नावाच्या बंद धाब्याच्या गोदामातून दारूचे बॉक्स आणण्यात आले असल्याची माहीती पोलिंसाना मिळाली.

पोलिस अधिक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलिस अधिक्षक समाधान पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, सॅम्युअल कांबळे, कृष्णा तंगे, समाधान तेलंगे्र, रंजित वैराळ, सचिन चौधरी, लखन पाचलौरे आदीनी केली.