Mon, Jul 06, 2020 15:36होमपेज › Jalna › सफाई निरीक्षकांच्या बदल्या

सफाई निरीक्षकांच्या बदल्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जालना : प्रतिनिधी

स्वच्छतेबाबत नागरिकांनी नगरसेवकांना भंडावून सोडल्यानंतर त्याचे पडसाद शनिवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले. स्वच्छता, घंटागाड्या, पाणी, घनकचरा प्रकल्प व सफाई निरीक्षकांचे कामाकडे होणारे दुर्लक्ष या प्रश्‍नावर पालिकेची शनिवार (31) रोजी घेण्यात आलेली सभा चांगलीच गाजली. यावेळी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणावर सफाई निरीक्षकांच्या तक्रारी केल्यामुळे एकाचे निलंबन तर इतरांच्या बदल्या करण्यात येणार आहे. 

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल होत्या. यावेळी उपाध्यक्ष राजेश राऊत, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, अतिरिक्त मुख्याधिकारी केशव कानपुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी नगरसेवकांनी वॉर्डातील स्वच्छतेच्या मुद्यासह सफाई निरीक्षकांची निष्क्रियता, उद्दामपणा याबाबत मोठ्या संख्येने तक्रारी केल्या. एका नगरसेवकाने वॉर्डातील सफाई करण्याचे सांगितले असता  निरीक्षकांने मुख्याधिकारी अथवा नगराध्यक्षांचे पत्र असल्याशिवाय  सफाई करणार नाही, असे सांगितल्याने सफाई कामगारास निलंबित करणार असल्याचे मुख्याधिकार्‍यांनी सांगितले.


  •