होमपेज › Jalna › छिंदमच्या पुतळ्याचे दहन

छिंदमच्या पुतळ्याचे दहन

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 17 2018 10:46PMअंबड : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदम यांच्या पुतळ्याचे शुक्रवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने बसस्थानकासमोर दहन करण्यात आले. अहमदनगर महानगरपालिकेचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी शिवजयंती अवघ्या तीन दिवसांवर आली असतानाच मनपा कर्मचार्‍याला उद्देशून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध केला आहे. यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष सतीश ढवळे यांनी म्हणाले की, 

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले असून मनपा कर्मचार्‍यालाही घाणेरडे शब्द वापरले. आमच्या दैवताबाबत आक्षेपार्ह शब्द वापरणार्‍यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.यावेळी कृष्णा शर्मा,जगन्नाथ काळे, संजय पडुळ, विनायक टापरे, रामप्रसाद वाघ, संभाजी औटे, प्रदीप पवार, आकाश खोले, राजेन्द्र सोनवणे, शरद चौधरी, निबांळकर, बरसाले, बाळू मुंजाळ यांच्यासहे पदाधिकारी उपस्थित होते.

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड

जालना : प्रतिनिधी 

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्यावतीने श्रीपाद छिंदम याचा निषेध करण्यात येऊन प्रतिमेस जोडे मारण्यात आले. त्याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष रविराज भालेकर, ज्ञानेश्‍वर भुसारे, अमोल कापसे, गणेश कोरडे, सुरज पाटोळे, कल्याण काटे, लक्ष्मण बुरकुल, नामदेव ठुणके आदी सहभागी झाले होते.

तीर्थपुरीत राष्ट्रवादीकडून निषेध 

तीर्थपुरी : प्रतिनिधी 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍या श्रीपाद छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

यासंदर्भात तीर्थपुरी पोलिस चौकीचे हवालदार डी.के.हवाले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समर्थ साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तमराव पवार, माजी सभापती तात्यासाहेब चिमणे, नारायण जामकर, तात्यासाहेब चिमणे, युवक तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, उपसरपंच भारत खोजे, गोविंद बोबडे, रामेश्‍वर चिमणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेना व शिवबा संघटना

तीर्थपुरी : प्रतिनिधी

येथे शिवसेना व शिवबा संघटनेच्या वतीने श्रीपाद छिंदम याच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. यावेळी उपस्थीत पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे, दिपक इंगळे, सतीश काळे, अंगद उबाळे, आकाश तापडिया, अशोक कोकाटे, दत्ता गवते, कल्याण बोबडे, शरद वाजे, सचिन भालेकर, अमोल गवते, नारायण बोबडे, ज्ञानेश्‍वर बोबडे, संभाजी गरड, आकाश तापडिया, अशोक बोबडे सहभागी झाले.