Mon, Jul 06, 2020 09:10होमपेज › Jalna › लेहा शिवारात मिरची जोमात

लेहा शिवारात मिरची जोमात

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 12 2018 11:12PMपिंपळगाव रेणुकाई : प्रतिनिधी 

भोकरदन तालुक्यातील लेहा परिसरात मिरची लागवड मोठ्या प्रमाणात लागवड झाली असून, मिरची पीक जोमात आहे.लेहा येथे सरासरीपेक्षा जास्त लागवड झाली आहे. मागील वर्षीपेक्षा जास्त मिरची लागवड झाल्याचे दिसून येते. परिसरातील अनेक शेतकर्‍यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत मिरची तसेच अन्य पीक लागवडीकडे कल वाढविला आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव  रेणुकाईसह परिसरातील दहा ते बारा गावांत सुमारे एक हजार हेक्टरवर मिरचीची लागवड करण्यात आली आहे.  उन्हाळी मिरचीचे पीक जोमात असून शेतकर्‍यांना मिरची उत्पादनाची प्रतीक्षा आहे. लेहा परिसरात यंदा शेतकर्‍यंनी मल्चिंग पेपरचा वापर करून मिरची लागवड केली आहे. अनेक शेतकर्‍यांनी ठिबकचाही वापर केला आहे. त्यामुळे मिरची पीक बहरात आहे. चांगला भाव मिळावा अशी शेतकर्‍यांना आशा आहे.