Fri, Jul 03, 2020 19:37होमपेज › Jalna › मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रम; आठ गावांची निवड 

मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रम; आठ गावांची निवड 

Published On: Mar 06 2018 1:18AM | Last Updated: Mar 06 2018 1:09AMजालना : प्रतिनिधी

मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या आठ गावांमधील गावकर्‍यांशी चर्चा करून विकासकामांचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. 

मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील निवड करण्यात आलेल्या आठ गावांच्या कामांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी जोंधळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे सहायक प्रकल्प संचालक शरद गिते, जिल्हा नियोजन अधिकारी रवींद्र जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत एक हजार गावांचा शासन व सीएसआर फंडाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आठ गावांची निवड करण्यात आली आहे. त्यात  बदनापूर तालुक्यातील बाजार वाहेगाव, माळेगाव, मंठा तालुक्यातील वैद्य वडगाव, अंभोरा जहांगीर, देवगाव खवणे, नायगाव, सेवली  व परतूर तालुक्यातील हातडी या गावांचा समावेश आहे.  

या गावांच्या सवार्र्ंगीण विकासासाठी गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन गावांत प्राधान्याने करावयाच्या विकासकामांबाबत गावकर्‍यांशी चर्चा करण्यात यावी. तसेच तालुकास्तरीय अधिकार्‍यांच्या बैठकीचे तातडीने आयोजन करून या कामांचा डीपीआर तयार करण्यात यावा.  बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.