Thu, Jul 09, 2020 05:09होमपेज › Jalna › भिल्ल समाजाचा आक्रोश मोर्चा

भिल्ल समाजाचा आक्रोश मोर्चा

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 11:11PMजालना : प्रतिनिधी

जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. 7) रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणाची कार्यवाही जलदगती न्यायालयात चालवावी आणि त्यासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

विष्णू वाघ, जितेंद्र चव्हाण, गुलाब मोरे, प्रल्हाद मोरे, अंकुश वेताळ, शिवाजी गांभुर्डेे, दीपक पवार, वसंत पवार, मंगल पवार, द्वारकाबाई मोरे, छाया बरडे, नंदाबाई माळी, नीता गायकवाड, गजानन माळी आदींची उपस्थिती होती.

या आहेत भिल्ल समाजाच्या मागण्या

सातेफळ येथील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 31 मार्च रोजी अ‍ॅड. रामकिसन जिजा बनकर याने बलत्कार केलेला आहे. आरोपी विधितज्ज्ञ तसेच गुंड प्रवृत्तीचा आहे. आरोपीस राजकीय पाठबळ असल्याने आर्थिक देवाण-घेवाणीतून या केसमधून सुटण्याची भीती निर्माण झाली आहे. 

फिर्यादी हा गरीब असल्याने त्यांच्या जीवितास धोका आहे. या प्रकरणाची केस जलदगती न्यायालयात चालवावी, शासनाकडून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्यात यावी. आरोपी यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, यासह निकाल लागेपर्यत आरोपीस जामीन देण्यात येऊ नये. पंच साक्षीदार यांना संरक्षण देण्यात यावे यासह आदी मागण्या करण्यात आल्या. जाफराबाद तालुक्यातील सातेफळ येथे गेल्या महिन्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला होता. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.