Thu, Jul 09, 2020 03:50होमपेज › Jalna › आधार व्हर्च्युअल प्रणाली लागू

आधार व्हर्च्युअल प्रणाली लागू

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 1:32AMजालना : प्रतिनिधी

आधारची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी एप्रिलमध्ये सुरू करण्यात आलेली व्हर्च्युअल आयडी प्रणाली  1 जुलैपासून लागू झाली आहे. आधारमधील डेटा लीक होत असल्याच्या प्रचंड तक्रारी आल्यानंतर युआडीएआयने यात काही बदल करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार व्हर्च्युअल आयडी हे नवे फीचर आणले जात आहे. आता सबसिडीसह अन्य सुविधांचा लाभ घेणार्‍यांना आधार क्रमांक देण्याची गरज नाही. या जागी व्हर्च्युअल आयडी म्हणजेच 16 अंकी क्रमांक द्यावा लागेल. या क्रमांकाने ऑथेंटिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण होईल.व्हर्च्युअल आयडीची प्रक्रिया करता यावी यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 30 जूनची मुदत दिली होती. त्यानुसार सिस्टीमध्ये बदल करण्याचे निर्देशही दिले होते. बँकांशिवाय इतर सेवा पुरवणार्‍यांनाही या बदलासाठी 1 जुलैची मुदत देण्यात आली होती. सध्या व्हर्च्युअल आयडीने केवळ ऑनलाइन पत्ता अपडेट करता येईल.

हा आयडी आहे काय..?

हा तात्पुरता 16 अंकी क्रमांक आहे. आधारचा क्लोन म्हणून हा क्रमांक ओळखला जातो. मोजकी माहितीच यात असेल. यूआयडीएआय  युजरला प्रत्येक आधारचा व्हर्च्युअल आयडी देण्याची संधी देईल. एखाद्याला कुठे आधारची माहिती द्यावयाची असेल तर 12 अंकी आधार क्रमांकाऐवजी तो 16 अंकी व्हर्च्युअल आयडी देऊ शकेल. हा आयडी जनरेट करण्याची सुविधा 1 जुलैपासून सुरू झाली आहे.

असा जनरेट करा व्हर्च्युअल आयडी

यूआयडीएआयच्या पोर्टलच्या होमपेजवर आधार क्रमांक टाका. सेक्युरिटी कोड टाकल्यानंतर जो मोबाइल  रजिस्टर असेल त्यावर ओटीपी येईल. ओटीपी टाकल्यानंतर आयडी जनरेट करण्यासाठी पर्याय मिळेल. त्यानंतर मोबाइलवर 16 अंकी क्रमांक येईल.

किती वेळ व्हॅलिड ?

सध्या हा आयडी एक दिवसासाठी व्हॅलिड. दुसर्‍या दिवशी आधारची गरज पडली तर युजर नवा आयडी जनरेट करू शकेल. आयडीचा एकदाच वापर करता येईल. दुसर्‍या ठिकाणी दुसरा आयडी जनरेट करावा लागेल.

याचा फायदा काय ?

यामुळे एखाद्या ठिकाणी पडताळणीसाठी आधार क्रमांक देण्याची गरज पडणार नाही. व्हर्च्युअल आयडीने नाव, पत्ता, फोटोसारख्या गोष्टींची पडताळणी होऊ शकेल. नवा आयडी जनरेट करताच जुना आयडी रद्द होईल.

आता फेस रिकग्‍निशन 

यूआयडीआयने आधारऐवजी फेस (चेहरा) रिकग्निशन सेवा सुरू करण्याची तारीख 1 जुलैऐवजी 1 ऑगस्ट केली आहे. ज्येष्ठ ज फिंगरप्रिंट जे लोक देऊ शकत नाहीत अशांसाठी ही सेवा असेल. यामुळे प्रत्येकांचे आधार अधिक सुरक्षित झाले आहे.