Mon, Jul 06, 2020 08:25होमपेज › Jalna › संपाची दखल न घेतल्यामुळे बँक कर्मचारी निराश

संपाची दखल न घेतल्यामुळे बँक कर्मचारी निराश

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 02 2018 11:47PMजालना : प्रतिनिधी

राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांमध्ये पुकारलेल्या संपाची दखल केंद्र शासनाने न घेतल्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये निराशा, संतप्तपणाची भावना निर्माण झाली आहे. येत्या आठ दिवसांनंतर आंदोलनाचा आणखी भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती.

बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या विविध संघटनांच्या युनियनने वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस संप पुकारला होता. याला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. 

विविध राष्ट्रीयीकृत बँकांच्या 100 शाखांमधील अधिकारी, कर्मचार्‍यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. दोन दिवसांच्या संपामुळे बँकेतील सर्व कामकाज कोलमडून गेले. साधारणतः जालना शहरामध्ये दररोज मोठी उलाढाल होत असते. या दोन दिवसांच्या संपामुळे जिल्ह्याचा विचार करता अनेक कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही. संप केल्यानंतरही केंद्र शासनाने याची काहीच दखल न घेता कोणतेच ठोस आश्वासन दिले नाही.

कर्मचार्‍यांची कोणतीही मागणी मान्य केली नाही. यामुळे सर्वच बँकेतील कर्मचार्‍यांमध्ये निराशा व संतप्तपणाची भावना निर्माण झाली आहे. येत्या आठ जूनला मुंबई येथे सर्व बँकांच्या वरिष्ठ नेत्यांची  बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये आंदोलन तीव्र करण्याचा दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयाची प्रभावीपणे.