Sun, Sep 20, 2020 02:57होमपेज › Jalna › जालन्यात सहाय्यक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

जालन्यात सहाय्यक फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

Last Updated: Sep 08 2020 10:31AM

संग्रहीत छायाचित्रजालना : पुढारी वृत्तसेवा 

येथील पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार सुभाष गायकवाड हे मंगळवारी (दि.८) सकाळी ८.४५ वाजण्याच्या दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यातच ते गतप्राण झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती कळताच पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, स्थागुशाचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, संजय लोहकरे, यशवंत जाधव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.आत्महत्येचे कारण समजून आलेले नाही.

 "