Mon, Jul 06, 2020 08:33होमपेज › Jalna › कत्तलीसाठी २५ गायी घेऊन जाणारा टेम्पो पकडला

कत्तलीसाठी २५ गायी घेऊन जाणारा टेम्पो पकडला

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:18PMआन्वा : प्रतिनिधी 

कत्तलीसाठी चालवलेल्या गायींचा टेम्पो  आन्वा येथील नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आला. यावेळी पकडलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली, मात्र अंधाराचा फायदा घेत तस्करांनी वाहनासह पोबारा केला. यामध्ये एका गोर्‍हाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. 

 जवळपास 20 ते 25 गायी व वासरे घेऊन जाणार टेम्पो  आन्वा गावातील नागरिकांनी अडवला. यावेळी तस्करांनी गडबडीत  वाहनातील जनावरांना खाली ढकलून दिल्याने त्यामधील काही गायी व जनावरे जखमी झाले. या सर्व प्रकारात एका लहान गोर्‍हयाचा मृत्यू झाला. या जनावरांना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी  केल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.  घटनेची माहिती रात्री पारध पोलिस ठाण्यात देण्यात आली. मात्र एवढ्या गंभीर घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.

 नागरिकांचा वाढता दबावाखाली पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन संबंधित घटनेची पहाणी केली. सुटका केलेल्या  जनावरांना आन्वा पाडा येथील शेतकर्‍यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.दरम्यान आन्वा येथे गेल्या काही महिन्यांपासून अवैधरीत्या जनावरांची मोठी तस्करी होत असल्याची चर्चा आहे. आठवड्यातून एक ते दोन वाहने या ठिकाणी भरून येथून परराज्यातील कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तरी देखील याकडे पोलिस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप नागरिकांनी केला आहे.
या संदर्भात संबंधित आरोपी विरोधात पारध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांनी दिली.