होमपेज › Jalna › वीज कर्मचार्‍यांवर कारवाई

वीज कर्मचार्‍यांवर कारवाई

Published On: Dec 05 2018 1:33AM | Last Updated: Dec 05 2018 1:33AMजालना : प्रतिनिधी

महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनाने जिल्ह्यात वीजबिल वसुली कमी झाल्याने तसेच मुख्यालयी न राहिल्याचा ठपका ठेऊन अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वेतनात 1/3 कपात केली आहे. महावितरणच्या या निर्णयाविरोधात वीज कर्मचारी, अभियंता संघटना कृती समितीने बुधवार 5 पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वेतन कपातीमुळे प्रशासन व कर्मचारी आमने-सामने आले आहेत.

महावितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील विभाग क्र 1 व 2 अंतर्गत काही अभियंता, तांत्रिक कामगार व कर्मचार्‍यांच्या वेतनातून ट्रान्सफार्मरमधील ऑईल कमी आल्याने तसेच वीजबिल वसुलीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण न झाल्याच्या  कारणावरून 15 अभियंत्यांसह तांत्रिक कर्मचार्‍यांचे 1/3 वेतन नोव्हेंबरच्या पगारातून कपात करण्यात आले आहे. तसेच विभाग -2 मध्येे मुख्यालयी न राहणार्‍या कर्मचार्‍यांना कोणतही विचारपुस न करता अथवा नेाटीस न देता त्यांना देण्यात येणारा घरभाडे भत्‍ता कमी  करण्यात आला आहे. या दंडात्मक कारवाईमुळे विज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांमधे संतापाचे वातावरण आहे.

या प्रकरणी विज कर्मचारी अंभियंता संघटना कृती समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना  30 नोव्हेबंर रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात अधिकारी व कर्मचार्‍यांवर झालेली कारवाई अन्यायकारक असुन कपात करण्यात आलेले 1/3 वेतन परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. कारवाई करतांना कोणतीही नोटीस कर्मचार्‍यांना देण्यात आलेली नसल्याचे म्हंटले आहे. अधिकारी व कर्मचारी विज वसुलीसह सर्व प्रकारची कामे निष्ठेने करत असतांना दुष्काळी परिस्थितीमुळे प्रयत्न करुनही अपेक्षीत वसुली होउ शकली नाही. ग्रामीण भागातील विज पुरवठा खंडीत करुनही महावितरणला वसुली करता आलेली नाही. याची जाणीव वरिष्ठांना आहे. तरी देखील केवळ आकसापोटी वेतन कपात करण्यात आली आहे.  ग्रामीण भागात ट्रान्सफार्मर जळाल्यानंतर अनेकदा गावकरी परस्पर ऑईल काढुन घेतात. याची माहिती अभियंता व कामगारांना नसते. त्यामुळे त्यांना यासाठी जबाबदार धरणे चुकीचे असते असे विज कर्मचारी -अभियंते संघटना संयुक्‍त कृती समितीचे म्हणने आहे. 

कार्यकारी अभियंता-1 यांच्याशी झालेल्या चर्चेप्रमाणे कपात झालेली दंडाची रक्‍कम परत करावी नसता बुधवार 5 पासुन बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर संयुक्‍त सचीव पी.एम. कुलकर्णी, सहसचिव आर.जे. नागरे, प्रादेशीक संघटन सचिव आर.एन.शडमल्‍लु यांच्या सह्या आहेत.