Mon, Jul 06, 2020 09:06होमपेज › Jalna › 61 हजार क्‍विंटल धान्य बचत 

61 हजार क्‍विंटल धान्य बचत 

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:17AMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात रेशन दुकानदारांसाठी लाभाथ्यार्र्ंना धान्य वाटप करताना पॉस मशीन बंधनकारक करण्यात आल्याने शासनाचा मोठा फायदा झाला आहे. पॉस मशिनमुळे एप्रिल 2017 ते मार्च 2018 या एका वर्षात तब्बल 61 हजार 172 क्विंटल धान्याची बचत झाली. त्यामुळे काळ्या धंद्याला चांगलाच चाप बसला आहे.

जिल्ह्यात 1 एप्रिल 2017 मधे 1280 मशिनद्वारे 3 लाख 43 हजार रेशन कार्ड असलेल्या लाभाथ्यार्र्ंना पॉस मशिनद्वारे धान्य वाटप करण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात मशिनच्या गोंधळामुळे रेशन दुकानदारांना पूर्वीच्या पध्दतीने धान्य वाटप करण्याचीं परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर पुरवठा विभागाने हे प्रमाण 80 टक्के व 20 टक्के असे केले. जून 2017 मध्ये वाटप करण्यात आलेल्या धान्यात 732 क्विंटल गहू व 490 क्विंटल तांदुळाची पूर्वीच्या तुलनेत बचत झाली. 

जुलै महिन्यात गहू 1254, तांंदूळ 838, ऑगस्ट गहू 2 हजार 142, तांदूळ 838, सप्टेंबर गहू  2 हजार 405, तांदूळ 1 हजार 519, ऑक्टोबर 2 हजार 999 तर तांदुळ 2 हजार 17 ,नोव्हेंबर गहु 4 हजार 451, तांदूळ 6 हजार 613, डिसेंबर गहू 3 हजार 526, तांदूळ 2 हजार 945, जानेवारी 2018  गहू 2 हजार 383, तांदूळ 6 हजार 8 38, फेब्रुवारी गहू 5 हजार 174, तांदूळ 6 हजार 60, मार्च गहू 2 हजार 414, तांदूळ 4 हजार 841 क्विंटलची बचत झाली आहे. पॉस मशिनमुळे बोगस कार्ड धारकांना मिळणारा लाभ बंद झाला असल्याने शासनाचे करोडे रुपये वाचले आहे. पॉस मशिनद्वारे धान्य वाटपास अनेक रेशन दुकानदार विविध कारणांमुळे असमर्थता दर्शवित आहेत. 

खर्‍या लाभार्थींना लाभ

काही लाभार्थी ठसे न जुळण्यासह रेंज नसणे या व यासारख्या कारणामुळे पॉस मशिनबाबत नाराजी व्यक्‍त करीत आहेत. सलग तीन महिने धान्य न उचलणार्‍या लाभार्थ्यास यादीतून वगळण्यात येणार आहे. या सर्व प्रकारात खर्‍या लाभाथ्यार्र्ंपर्यंत शासनाचा लाभ पोहोचविला जात असल्याने शासनाचा हेतू साध्य होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.