जालना : पुढारी वृत्तसेवा
राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. जालना जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आलेल्या अहवालात पुन्हा दोन नवीन रूग्णांची भर पडली आहे.
खासगी रुग्णालयाच्या एका कर्मचाऱ्यासह जाफराबाद तालुक्यातील हिवरा काबली येथील एकाचा समावेश आहे. यामुळे जालना जिल्ह्याची संख्या आता ५४ वर पोहचली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.