जालना : पुढारी वृत्तसेवा
मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालन्यात पोहचलेल्या दोन भावांसह एकाच्या पत्नीचा अहवाल बुधवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४४ वर पोहचली आहे.
वाचा : जालना : साडेगावात अनैतिक संबंधातून खून
जालना तालुक्यातील वखारी वडगाव येथील मुळ रहिवाशी असलेले दोन भाऊ आणि या दोघांपैकी एकाची पत्नी असे तिघे जण मुंबई येथे कामानिमित्त गेले होते. हे तिघेही मुंबई येथून दोन दिवसांपूर्वी जालना येथे परतल्यानंतर त्यांना खोकला आणि ताप आल्याने हे तिघेही अंबड येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झाले होते.
अंबड येथून या तिघांना जालना येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल बुधवारी रात्री उशिरा या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आला असून, जालना जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ४४ वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल अर्धशतकाकडे सुरू झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले बहुतेक रुग्ण बाहेरून आलेले आहेत.