Mon, Jul 06, 2020 07:59होमपेज › Jalna › ‘समृद्धी’साठी ३६५ हेक्टर जमीन खरेदी

‘समृद्धी’साठी ३६५ हेक्टर जमीन खरेदी

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 11:10PMजालना : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीस एप्रिल महिन्यात ब्रेक लागला आहे. आतापर्यंत जवळपास 365 हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अजूनही 75 हेक्टर जमीन खरेदीची प्रक्रिया बाकी आहे. 

एप्रिलच्या एक तारखेला पाच खरेदीचे व्यवहार पूर्ण झाले होते. त्यानंतर व्यवहार थंडावले. जालना तालुक्यातील जामवाडी येथील अखेर खरेदी प्रक्रियाचे व्यवहार सुरू झाले आहे. जालना, जामवाडी, श्रीकृष्णनगर जमिनीचे दर निश्‍चित झाले, परंतु मार्केटपेक्षा दर कमी असल्याने शेतकर्‍यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. 

समृध्दी महामार्गास शेतकरी जमीन देण्यास तयार आहे, परंतु योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकर्‍यांत नाराजी दिसून येत आहे. तसेच संयुक्त मोजणी चुकीची झाल्याने बागायती क्षेत्र कोरडवाहू दाखविण्यात आले. शेतातील फळझाडे, विहीर यांची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकर्‍यांतून होत आहे. 

Tags : jalna, Smruddhi, 365 hectares, land purchase,