Thu, Jul 09, 2020 04:10होमपेज › Jalna › जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना २६३ कोटी मंजूर 

जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांना २६३ कोटी मंजूर 

Published On: May 12 2018 1:27AM | Last Updated: May 12 2018 1:27AMजालना : प्रतिनिधी 

जालना  जिल्ह्यात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने हजारो हेक्टरमधील कपाशी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते  बोंडअळीमुळे शेतकर्‍यांना मोठा फटका बसला होता. 

खरीप हंगामात बोंडअळी आणि तुडतुडे रोग प्रभावीत पिकांच्या शेतकर्‍यांना  राज्य शासनाने  मदत देण्याबाबातचा शासन निर्णय जारी  केला असून  यानुसार 3 हजार 484 कोटी रुपये रक्कम शेतकर्‍यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे. 3 समान हप्त्यांत ही मदत शेतकर्‍यांना वितरित केली जाणार आहे जालना जिल्ह्यासाठी 263 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, यापैकी रु. 73.43 लक्ष निधी प्राप्त झाला असून निधी वाटपाचे आदेश काढण्यात आले आहे व उर्वरित रक्कम  लवकरच  शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने नुकसानीसंदर्भात जिल्ह्यात सुरू असलेल्या पंचनाम्याबाबतचा सविस्तर आढावा पालकमंत्री लोणीकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडून वेळोवेळी घेऊन पाठपुरावा केला  विभागीय आयुक्तांना नुकसान भरपाईसाठी मागणी प्रस्ताव  शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले. 

जालना जिल्ह्यात 372414  हेक्टर क्षेत्रातील 528873 शेतकर्‍यांचे  कपाशी पिकांचे कमी अधिक प्रमाणात अतोनात नुकसान झाले होते  यासंदर्भात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी नोव्हेंबर 2017 मध्येच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या नुकसानीसंदर्भात माहिती दिली होती. 

शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे तत्काळ नुकसानाचे पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत द्यावी, अशी मागणी पालकमंत्री लोणीकर यांनी मुख्यामंत्र्यांकडे केली होती. तसेच मंत्रिमंडळ बैठकीतसुद्धा याविषयी वेळोवेळी पुढाकार घेतला जालन्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून या नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भात तातडीने दखल घेऊन राज्यात सर्वत्र नुकसानीचे पंचनामे  करण्याचे आदेश दिले.