Fri, Jul 03, 2020 19:11होमपेज › Jalna › आरटीईसाठी 2 हजार अर्ज, इंग्रजीसाठी स्पर्धा

आरटीईसाठी 2 हजार अर्ज, इंग्रजीसाठी स्पर्धा

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:45AMजालना : प्रतिनिधी 

खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी प्रवेश वाढवण्यासाठी चक्क शाळेतील विद्यार्थ्यांमार्फतच आपल्या शेजारी राहणार्‍या पालकांना निमंत्रणाचे चॉकलेट देणे सुरू केले आहे. सध्या प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या परिसरातील इतर मुलांना शाळेत बोलावून त्यांचे मत परिवर्तन करण्याचा नवा फंडा शाळा प्रशासनाने काढल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केल्या जात आहे. विशेष म्हणजे शहरालगतच्या परिसरात आतापासूनच प्रवेशासाठी शाळा प्रशासनातील व्यक्ती घराभोवती घिरट्या मारीत असल्याचे दिसून येते. 

शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे फॅड सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये रांगेत लागून पालकांनी अर्ज घेतले. तर बहुतांश नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी पहिलीपासून प्रवेश ‘फुल्ल’ झाल्याचा आव आणला आहे. कुणी प्रवेश मागण्यासाठी गेल्यानंतर दाबून डोनेशन मागणे सुरू केले आहे. तरीसुद्धा पालकांची या बाबीला मूकसंमती असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. 

शाळांमध्ये चांगलीच स्पर्धा निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांअभावी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा ओस पडत आहे. काही शाळा डिजिटल झाल्याने त्यांनी छाप पाडली आहे, परंतु या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढताना दिसून येत नाही हे विशेष.