Mon, Jul 06, 2020 14:53होमपेज › Jalna › 11 प्रकल्प कोरडे

11 प्रकल्प कोरडे

Published On: Jul 30 2018 1:29AM | Last Updated: Jul 29 2018 10:38PMजालना : प्रतिनिधी

जिल्ह्यात अर्धा पावसाळा उलटूनही एक मध्यम प्रकल्पासह तब्बल 11 लघु प्रकल्प कोरडेच असल्याने दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. पुरेसा पाऊस नसल्याने पाणीबाणीचे चित्र जिल्ह्यात पाहवयास मिळत आहे. पावसाचे दोन महिने कोरडे गेल्याने पाणीटंचाईचे मोठे संकट घोंगावत आहे. 57 लघु व 7 मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल 12 तलाव कोरडे आहेत.

उर्वरीत तलावांतील पाणीपातळीही पाऊस नसल्याने झपाट्याने खालावत असून सध्या केवळ 3. 56 टक्केउपयुक्‍त जलसाठा असल्याने गंभीर परिस्थिती ओढवली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात केवळ 220 मिमी एवढ्याच पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ 32 टक्के आहे. खरिपाची पिके रिमझिम पावसावर तरली असली तरी पिके वाढीला लागलेली असतानाच पावसाने दडी मारल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भोकरदन  व जाफराबाद तालुक्यांत भर पावसाळयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सात मध्यम प्रकल्पांत केवळ 5.96 तर 57 लघु प्रकल्पात केवळ 2.51 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. 28 लघु व 1 मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली आहे. आगामी काही दिवसांत मोठे पाऊस न पडल्यास जिल्ह्यावर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.