Tue, Mar 31, 2020 20:53होमपेज › Jalna › कोल्हापूर : गोकुळच्या गाय आणि  म्‍हैस दूध दरात वाढ

कोल्हापूर : गोकुळच्या गाय आणि  म्‍हैस दूध दरात वाढ

Last Updated: Jan 17 2020 1:14AM

संग्रहित छायाचित्रकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाय व म्‍हैस दुध खरेदी दरामध्‍ये १ जानेवारी २०२० पासुन दरवाढ करण्यात येणार आहे. दरम्यान गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ साठी प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे.  त्‍यामुळे गाय दूध दर २७  रूपये वरून २९ रूपये इतका होणार आहे. तसेच म्‍हैस दूध खरेदी दरामध्‍ये ७.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता एक रूपये ७० पैसे इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे म्‍हैस दूध खरेदी दर ४२.३० पैसे वरून ४४ रुपये इतका होणार आहे.

अधिक वाचा : ‘क्रियाशील’वरून ‘गोकुळ’च्या राजकारणाला फुटणार उकळी

अशाप्रकारचे परिपत्रक जिल्हा दूध संघामार्फत (गोकुळ) प्राथमिक दूध संस्थाना पाठवणेत आल्याचे चेअरमन रविंद्र आपटे यांनी सांगीतले आहे. दरम्यान आगामी काळात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) 2020 ते 2025 या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये २३ डिसेंबर ते २२ जानेवारी या कालावधीत ठराव जमा करून घेतले जाणार आहेत. यानिमित्ताने गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

अधिक वाचा : ‘गोकुळ’ची वीज, पाणी तोडा

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांनी ताकदीने उतरण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत आ. पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, दोन्ही गटाकडून बैठकांना जोर चढला आहे. ‘गोकुळ’ची निवडणूक २३ एप्रिल २०२० च्या दरम्यान होणार आहे.