Sat, Jul 04, 2020 08:30होमपेज › International › आईला सोबत घेऊन हनीमूनला गेली पतीचा सासूवर जडला जीव 

आईला सोबत घेऊन हनीमूनला गेली पतीचा सासूवर जडला जीव 

Last Updated: Jan 20 2020 8:27PM
लंडन : पुढारी ऑनलाईन

कोणत्याही मुलीचे आई-वडील हे आपल्या मुलींचा संसार चांगला व्हावा असा आशीर्वाद देऊन मुलींचे कन्यादान करतात. पण, एक अशी घटनासमोर आली आहे. ज्यामुळे नातेसंबंधाचा पार विचका झाला आहे. हनीमुनला जाताना आईला घेऊन गेली. पण आईचे आणि नवऱ्याचेच सुत जुळले. मुलीला आपल्या १५ वर्षांच्या संसारावर पाणी सोडाव लागलं. एखाद्या चित्रपटाची कथा वाटणारी ही घटना घडली आहे लंडनमधील ट्विकेनहम येथे.

वाचा :येमेनमध्ये क्षेपणास्त्र हल्ला

ही घटना लंडनमधील घडली. ट्विकेनहम  येथे राहणारी एक मुलगी आपल्या आईला हनीमूनला सोबत घेऊन गेली होती. पण पतीला आपल्या सासूवरच प्रेम जडले त्यानंतर काही दिवसात त्याने पत्नीशी काडीमोड घेऊन सासूसोबतच संसार थाटला. ३४ वर्षीय लुरेन वॉल या तरुणीने वयाच्या १९ व्या वर्षी पॉल व्हाइट या तरुणाशी लग्न केल. लुरेनची आई जुली हिने १५ हजार पौंड (अंदाजे १४ लाख रुपये) दिले. आईने मदत केल्याने लुरेन पॉलबरोबर हनीमूनला जाताना आईला घेऊन गेली. दोन आठवड्यांच्या सहलीसाठी हे तिघेजण डीव्होन येथे गेले होते. या सुट्टीवरुन परत आल्यावर आठ आठवड्यानंतर पॉल घर सोडून गेला.  त्यानंतर नऊ महिन्यांनी जुली यांनी एका मुलाला जन्म दिला. आपल्या आयुष्यात काय सुरु आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या लुरेनला तिच्या आईने, “मी आणि पॉल एकत्र राहत असून सहलीदरम्यान आमची जवळीक वाढली,” अशी कबुली दिली. जन्माला आलेले बाळ हे पॉलचेच असल्याचेही तिने लुरेनला सांगितले. 

वाचा :मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं?: बापाला निरोप देताना 'या' चिमुरडीमुळे जग गहिवरले!

“पॉल आणि आईचे एकमेकांशी चांगले नाते होते. या दोघांमध्ये काही वेगळ घडत असेल अस मला कधीही वाटल नव्हतं. ते दोघे एकमेकांची खूप मस्करी करायचे. हसायचे. यात मला काहीच वावग वाटल नव्हतं,” असं लुरेनने सांगितते. लुरेनबरोबर अनेक वर्ष एकत्र असलेला पॉल अचानक स्वत:चा फोन जपून वापरु लागला. एकदा लुरेनच्या बहिणीनेच आईचा फोन वापरताना त्यामधील पॉलबरोबरचे चॅट पाहिले आणि त्याबद्दल लुरेनला माहिती दिली. मात्र त्यावेळी जुलीने ‘माझ्यात आणि पॉलमध्ये तस काहीच नाहीय वेडी आहेस का तू?’ असं म्हणत लुरेनचा प्रश्न उडवून लावला होता. “मी जेव्हा पॉलकडे याबद्दल विचारणार केली तेव्हा त्याला धक्का बसला. मी त्याला फोन दाखवण्यास सांगितला तेव्हा त्याने नकार दिला. जेव्हा माझ्यासोबत अस काही घडलं हे मला न कळण्यापलीकडे होतं. माझं आयुष्यचं संपून गेलं. ज्या आईने मला जन्म दिला. ज्या व्यक्तीवर मी विश्वास ठेवला त्यानेच मला धोका दिला. माझ्या आयुष्यातला हा सर्वात वाईट क्षण होता. जी आई आपल्या मुलीचाच संसार उद्ध्वस्त करते, की कोणत्याही माफीच्या लायक नाही. मी दोघांनाही माफ करणार नाही, असा संताप लॉरेनने व्यक्त केला.