Tue, Aug 04, 2020 22:06होमपेज › International › खऱ्याखुऱ्या नोटांचा पाऊस अन् त्या गोळा करण्यासाठी गर्दीचा महापूर (video)

खऱ्याखुऱ्या नोटांचा पाऊस अन् त्या गोळा करण्यासाठी गर्दीचा महापूर (video)

Published On: Jul 12 2019 3:24PM | Last Updated: Jul 12 2019 2:59PM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

जर का एखाद्याला शंभर रूपये जरी सापडले तर ती व्यक्ती किती खुश असते. मात्र, हे जर का ते डॉलरमध्ये पाऊस पडल्यासारखे रस्त्यावर सापडले तर काय होईल? ही काय कल्पना करण्याची गोष्ट नाही. पण ही गोष्ट सत्यात घडली. अमेरिकेतील एका महामार्गावर पाऊस झाल्यासारखा डॉलरचा पाऊस झाला. चारही बाजूंनी फक्त डॉलर आणि डॉलरच पहाताच लोकांनी आपल्या गाड्या थांबवत या डॉलरवर तुटून पडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

नॉर्थ अटलांटा महामार्ग नंबर २८५ वरून डॉलरने भरलेला ट्रक जात होता. यावेळी या ट्रकचा अचानक दरवाजा उघडल्यानंतर पाऊस झाल्यासारखा डॉलर पाऊस झाला. आणि आश्चर्य म्हणजे ते खरे खरे डॉलर होते. डॉलर पाहताच लोकांनी आपल्या गाड्या थांबवत ते घेण्यासाठी एकच झुंबड उठवली. यात 1,75,000 डॉलर म्हणजेच १.२० कोटी लंपास झाल्याचे आर्मर्ड ट्रक कंपनीने सांगितले.

नागरिक लुटत असलेल्या नोटांचा काही नागरिकांनी व्हिडिओ केला. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिस असूनही नागरिक नोटा लुटण्यात मग्न असल्याचे डनवुडी पोलिसांनी सांगितले.

यानंतर डनवुडी पोलिसांनी लोकांनी लुटलेले हे पैसे परत करण्याचे आवाहन केले. तर मिळालेले हे पैसे बेकायदेशीर असल्याचे सांगत जर का हे पैसे परत केले नाही तर कारवाई करणार असल्याचे सांगितले. यानंतर बुधवारी रात्रीपर्यंत फक्त सहाच लोकांनी पोलिस ठाण्यात येत ४,४०० डॉलर म्हणजे ३ लाख रूपये परत केले.