Tue, Mar 09, 2021 16:19
या गावात 66 दिवसांनंतर झाले सूर्यदर्शन

Last Updated: Jan 24 2021 7:59PM
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन 

अमेरिकेतील एक राज्य अलास्कामधील उत्कियाविक शहरामध्ये तब्बल 66 दिवसांनंतर शुक्रवारी सूर्यदर्शन झाले; मात्र केवळ एक तासापुरतेच. यावेळी तेथील लोकांनी घराबाहेर पडून पारंपरिक नृत्य करून जल्लोष साजरा केला. 

यापूर्वी 18 नोव्हेंबर 2020 रोजी या भागात सूर्याचे अखेरचे दर्शन घडले होते. उत्कियाविक शहराची लोकसंख्या 4400 इतकी आहे. या ध्रुवीय प्रदेशात प्रत्येक हिवाळ्यात तब्बल दोन महिन्यांनंतर सूर्याचे दर्शन होत असते. 

या भागात सूर्य तर रोज उगवतोच; पण सूर्याची किरणे इथपर्यंत पोहोचत नाहीत. उत्कियाविकसह अनेक शहरांना दरवर्षी हिवाळ्यात अशा हवामानाचा अनुभव येत असतो.