Thu, Nov 26, 2020 21:18होमपेज › International › पाक संसदेत ‘मोदी... मोदी’ जयघोष!

पाक संसदेत ‘मोदी... मोदी’ जयघोष!

Last Updated: Oct 30 2020 1:51AM
इस्लामाबाद : वृत्तसंस्था

भारतामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांतून, कार्यक्रमांतून ‘मोदी... मोदी, मोदी... मोदी’ हा जयघोष आता नवीन बाब राहिलेली नाही, हा घोष करणार्‍यांना ‘भक्त’ हे नामकरणही प्राप्त झालेले आहे; पण आपला सख्खा शेजारी असलेल्या पाकिस्तानच्या संसदेतही ‘मोदी... मोदी... मोदी...’चा घोष गुरुवारी निनादला... आणि पाकिस्तान संसदेचा अवघा नूरच पालटून गेला.

फ्रान्समधील घटनेच्या निषेधार्थ फ्रान्सच्या मालावर बहिष्कार घालावा, असे आवाहन कुरैशी पाकिस्तानी संसदेत तावातावात करत होते आणि अचानक बलुच खासदारांनी ‘मोदी... मोदी... मोदी...’चा जयघोष सुरू केला. विशेष म्हणजे, भारत सरकारने या विषयावर फ्रान्सच्या बाजूने आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत फ्रान्ससोबत असल्याचे गुरुवारीच स्पष्ट केले आहे.