Sun, Oct 25, 2020 07:54होमपेज › International › चक्क विमानात 'त्या' व्यक्तीने उघडली छत्री  

चक्क विमानात 'त्या' व्यक्तीने उघडली छत्री  

Last Updated: Jul 14 2020 10:56AM
मास्को : पुढारी ऑनलाईन

रशियामध्ये चक्क विमानात पाण्याचे थेंब टपकण्यास सुरुवात झाली. यापासून बचाव करण्यासाठी एका प्रवाशाने विमानातच छत्री उघडली. हे पाहून त्या विमानातील प्रवाशीही चकीत झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आता या घटनेची दखल संबंधित विमान कंपनीने घेतली आहेत. या घटनेच्या चौकशीचे आदेश विमान कंपनीने दिले आहेत.  

वाचा : कोरोना विषाणूची परीक्षा पडली महागात, गेला हकनाक बळी 

खाबरोवस्क आणि सोची दरम्यान रेसिया एअरलाईन्सच्या विमानात एक प्रवाशी छत्री घेऊन बसल्याचे दिसत आहे. पावसाच्या पाण्याचे थेंब त्यांच्यावर पडत होते. प्रवाशी विमानात कुठून पाणी पडत आहे हे शोधत होते. 

या घटनेनंतर एअरलाइन्सने तपासणी केली, तर त्यांना या गळतीचे कारण एयर कंडिशनिंग सिस्टममध्ये बिघाडी असल्याचे दिसले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वाचा : ...तर कोरोनामुळे अत्यंत वाईट स्थिती होईल; 'डब्ल्यूएचओ'ने दिली धोक्याची सूचना 

 

 "