वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन
अमेरिकेत कोरोनाचे थैमान सुरुच असून गेल्या २४ तासांत तब्बल ५२ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत कोरोना रुग्णांचा एका दिवसांतला हा उच्चांकी आकडा आहे. याबाबतची आकडेवारी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिली आहे.
वाचा : कुठे आहे मानवाधिकार?
गेल्या २४ तासांत ५२ हजार ८९८ रुग्ण आढळून आल्याने अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा २६ लाख ८२ हजार २७० वर पोहोचला आहे. तसेच एका दिवसात ७०६ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या १ लाख २८ हजार २८ झाली आहे.
वाचा : राज्यातील दोन टक्के कोरोनाग्रस्त गंभीर स्थितीत
अमेरिकेत दरदिवशी सुमारे ४० हजार रुग्ण आढळून येत होते. याआधी एका दिवशी ४२ हजार रुग्णांची नोंद झाली होती. मात्र, गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने उच्चांक गाठला आहे.
जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी ८ लाखांवर पोहोचली आहे. तर आतापर्यंत ५ लाख १८ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ५९ लाखांहून अधिक लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
वाचा : देशात दिवसात उच्चांकी 507 मृत्युमुखी
अमेरिकेपाठोपाठ ब्राझिलमध्ये मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. ब्राझिलमध्ये आतापर्यंत १४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा ६० हजारांवर पोहोचला आहे.